समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलानां मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

1. शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 17/03/2009. 
2. शासन निर्णय : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 01/03/2021. 


उहिष्टे :-

अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणणे कामी सदर शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजने मध्ये केंद्र सरकारने सुधारणा केलेल्या असून त्याची अंमलबजावणी दि.01/04/2008 पासून लागू करण्यात आलेली आहे. सन 2020-21 पासून सदर शिष्यवृत्तीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. प्राप्त अनुदानानुसार सदर योजनेमध्ये प्राप्त प्रस्ताव निकाली काढण्यात येत असतात. 


अटी व शर्ती :-

1. अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबंधित सफाईगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तिंच्या पाल्यांना अनुज्ञेय आहे. 
2. ही शिष्यवृत्ती सर्व जाती धर्माला लागू आहे. 
3. ही योजना केंद्र पुरस्कृत असुन यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट नाही. 
4. अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ग्रामसेवक व सरपंच, नगरपालिका मुख्याधिकारी महानगरपालिका आयुक्त / उपायुक्त / प्रभाग अधिकारी यांच्याकडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबातचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 
5. अनुसूचित जाती मध्ये समावेश केलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी जातीचा दाखला. 


लाभाचे स्वरूप :-

1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्यांना रू. 110/- दरमहा व तदर्थ अनुदान रू. 750/-
1 ली ते 10 वी मधील विद्याथ्यांना रू. 225/- दरमहा व तदर्थ अनुदान रू. 750/-
(सन 2020-21 पासून शिष्यवृत्तीचे दरात वाढ) 


संपर्क:- संबंधित शाळेचे मुख्याध्यापक