समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

इयत्ता 9 वी 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना 

1. शासन निर्णय: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई, दि. 04/10/2013. 

उहिष्टे :-

1. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे. 

अटी व शती :-

1. शासकीय मान्यताप्राप्त शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांस लागू राहील. 
2. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा रु. 2 लक्ष इतकी असावी. 
3. विद्यार्थ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. 

लाभाचे स्वरूप :-

9 वी व 10 वी विद्यार्थ्यांना रू. 150/- दरमहा व तदर्थ अनुदान रू. 750/-

संपर्क:- संबंधित शाळेचे मुख्याध्यापक