समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य

1. शासन निर्णय :- समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई दि.30/01/1999, 
2. शासन निर्णय :- सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 06/08/2004. 
3. शासन निर्णय :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 01/02/2010. 

उद्दिष्टे :-

राज्यातील जातीयता भेदाभेद कमी करण्यासाठी, जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना अर्थसहाय्य देणे ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. 

रूप :-

अनुसूचित जाती, जनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौध्द, शिख या पैकी दूसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास तसेच मागासवर्गीतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विवाहीत जोडप्यांना या योजने अंतर्गत प्रती जोडपे रु. 50,000/- अर्थसहाय्य देण्यात येते. सदरची रक्कम पती पत्नीच्या संयुक्त नावाने असलेल्या बैंक खात्यावर RTGS द्वारे प्रदान करण्यात येते. 

संपर्क:- संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेंतर्गत Mahabany.in या वेबसाईट वर सदर योजनेची संपूर्ण माहिती मिळेल