समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

वृब्द साहित्यीक व कलावंत यांना मानधन योजना

उद्दिष्टे :-

वृध्द साहित्यीक व कलावंत ज्यांनी 10 ते 20 वर्ष कलाक्षेत्रात मोलाची कामगीरी बजावली व ज्यांचे वय 50 वर्षे पेक्षा जास्त आहे असे वृध्द कलावंत या योजनेस पात्र आहेत. 

अटी व शती :-

1. अर्जदार किमान 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
2. अर्जदाराचे वय 50 वर्षा पेक्षा जास्त असावे. 
3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 48,000/- पेक्षा जास्त नसावे. 
4. कला क्षेत्रात 15 ते 20 वर्ष इतका काळ कार्य केल्याचे पुरावे सादर करणे आवश्यक. 
5. शासनाच्या अन्य कोणत्याही योजने खाली नियमीत मासिक आर्थिक लाभ घेणारी व्यक्ति या मानधन योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र राहणार नाही. 

संपर्क:- संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय