समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

दिव्यांग अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्यता योजना

1. शासन निर्णय :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. 17/06/2014. 

उहिष्टे :-

दिव्यांग व अव्यंग असलेल्या व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देणे. 

अटी व शर्ती :-

1. वधू अथवा वराकडे किमान 4० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे. 
2. दिव्यांग वधू किंवा वर या पैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 
3. विवाह हा कायदेशिररीत्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदवीलेला असावा. 
4. विवाह झाल्यानंतर किमान 1 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. 

लाभाचे स्वरूप :-

1. रक्कम रु. 25,000/- चे बचत प्रमाण पत्र. 
2. रु. 20,000/- रोख स्वरुपात. 
3. रु. 4,500/- संसार उपयोगी साहित्य / वस्तु खरेदी करणे. 
4. रु. 500/- स्वागत समारंभ कार्यक्रम खर्च. 

संपर्क:- संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय