समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

राजमाता जिजाऊ अर्थसहाय्य योजना

1

उद्दिष्टे:-

  • दिव्यांग बालकांचा सर्वांगीण विकास करणे,
  • आर्थिक दुर्बल घटकातील ते ६ वर्षे वयोगटातील दिव्यांग बालकांसाठी त्यांच्या मातांना आर्थिक मदत देऊन सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे
  • दिव्यांग बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे
  • अतितीव्र दिव्यांगत्व असलेल्या बालकांना शीघ्र, भौतिक, व्यवसायी, वाक-भाषा, श्रावण इत्यादी वैद्यकीय पुनार्वसनात्मक सोयी वेळेवर देऊन दिव्यांगत्वावर मात करण्यास प्रोत्साहित करणे

अटी व शती :-

1. ग्रामीण भागातील अतितीव आधाराची गरज असणाऱ्या बहदिव्यांग ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या मातांना प्राधान्य देण्यात येईल.

2. एकाच कुटुंबात दोन दिव्यांग बालके असल्यास त्यापैकी एकाच बालकास या योजनेकरिता प्राधान्य देण्यात येईल.

3. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

4. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर समितीच्या शिफारशी नुसार पात्र उमेदवारास लाभ देण्यात येईल.

5. १००% दिव्यांग बालक यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल नंतर ६०% ते ९९ पर्यंत.

6. देण्यात येणारी अनुदान भत्ता रक्कम ही फक्त आरोग्य विषयक औषधे, थेरपी सेवा इत्यादी संबंधित पुनर्वसन साहित्य खरेदी करण्याकरिता देण्यात येईल,

 

संपर्क:- संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायत व  पंचायत समिती