समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

दिव्यांगांसाठी शासकीय संस्था

1. शासकीय दिव्यांगांची कर्मशाळा:-

या संस्थेमध्ये १८ ते ४५ वर्ष वयोगटातील अस्थिव्यंग व मुकबधीर लाभार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, सुतारकाम, आमेचर वाईनडिंग, बुक बाईडिंग व शिवणकला या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येते.

2. शासकीय बहु. दिव्यांग मुलांचे संमिश्र केंद्रः-

या संस्थेमध्ये ६ ते १६ वर्ष वयोगटातील अस्थिव्यंग व मुकबधीर मुलांना शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येतो.

3. शासकीय दिव्यांग बाल विकास गृह:-

या संस्थेमध्ये ६ ते १६ वर्ष वयोगटातील अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना शिक्षण व पुनर्वसनासाठी प्रवेश देण्यात येतो.

संपर्क:- संबंधित दिव्यांग शाळा/ कर्मशाळेचे अधीक्षक