समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती देण्यात येते . 

पात्रतेचे निकष /अटी शर्ती:

  1. विद्यार्थ्यी अनुसूचित जाती/ नवबौध्द घटकातील असावा.
  2. विद्यार्थ्यी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  3. शासन निर्णय दि.30.10.2023 अन्वये विद्यार्थ्याचे कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8.00 लाखापेक्षा जास्त नसावे.

  4. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे.

याबाबत अधिक माहीती करीता महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in सकेंत स्थळावर प्रत्येक वर्षी विस्तृत जाहीरात प्रसिध्द करण्यात येते .