समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

अनुसूचित जातीच्या सहकारी औद्योगिक संस्थांना अर्थसहय्याची योजना

उद्दिष्ट :

सहकाराच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे या उद्देशाने त्या घटकांतील संस्थांना अर्थ सहाय्य देण्याची योजना आहे. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या यंत्रमाग सोसायट्या, निटींग गारमेंट्स, सूत प्रोसेसिंग यूनिट्स, शेती माल प्रक्रिया, साखर कारखाने, खांडसरी कारखाना रुपांतरीत करणे व तत्सम उद्योगाचा समावेश आहे.

स्वरुप :

सहकारी संस्थांना द्यावयाचा अर्थसहाय्याचे सूत्र खालील प्रमाणे आहे.

  • सहकारी संस्थाचा स्व:हिस्सा - 5%
  • सहकारी संस्थांना शासकीय भाग भांडवल -35%
  • शासकीय दीर्घ मुदतीचे कर्ज -35%
  • वित्तिय संस्थाकडून कर्ज -25%

अटी व शर्ती :

  • सहकार कायद्या अंतर्गत संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक.
  • संस्थेचे 70% भागधारक हे अनुसूचित जातीचे/नवबौध्द असावेत.
  • संस्थेने प्रकल्पाच्या 5% स्व:हिस्सा भाग भांडवल जमा करणे आवश्यक आहे.
  • शासनाने या योजनेसाठी विहीत केलेल्या 1 ते 32 अटी व पुरक अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

औद्योगिक सहकारी संस्थेचे नाव :

  • वासुदेव मागासवर्गीय यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्या., सेलु, ता.कळमेश्वर, जि.नागपूर
  • भिमशक्ती मागासवर्गीय तेलबिया कृषि प्रक्रिया औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या., वसाहत आय.टी.आय जवळ, ता.भिवापुर, जि.नागपूर
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला औद्योगिक सहकारी संस्था., उमरेड, जि.नागपूर
  • रमाई मागासवर्गीय महिला औद्योगिक सहकारी संस्था, कातलाबोडी, ता.काटोल, जि.नागपूर

संपर्क :

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर