समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

अनुसूचित जाती / नवबौद्ध लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे

उद्दिष्ट:

उपरोक्त योजनेत निवड झालेल्या अनुसूचितजाती लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणं.

अटी व शर्ती:

लाभार्थ्यांची निवड खालील प्राधान्य क्रमांकानुसार करण्यात येते(उतरत्या क्रमानं)

  1. दारिद्रयरेषेखालील लाभार्थी.
  2. अत्यल्प भूधारक शेतकरी(1 हेक्टरपर्यंतचे भूधारक)
  3. अल्प भूधारक शेतकरी(1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक)
  4. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
  5. महिला बचत गटातील लाभार्थी (अनु.1 ते 4 मधील)

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत.
  2. ग्रामपंचायत (नमुना क्र.8 चा उतारा)
  3. दारिद्रयरेषेखालील असल्याचा दाखला.
  4. 7/12 व होल्डिंग उतारा.
  5. जातीच्या दाखल्याची सत्यप्रत.
  6. अपत्य दाखला सत्यप्रत.
  7. रोजगार स्वयंरोजगार नोंदणी कार्डाची सत्यप्रत.
  8. बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र.

लाभाचे स्वरूप:

योजनेमध्ये गटासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण.

संपर्क :

  1. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. नागपूर
  2. गट विकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती