समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

नागरी क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्दांना मोफत घरगुती जोडणी (ना.श.प्र)

उद्दिष्ट:

अनुसूचित जाती व नवबौद्ध यांना घरगुती विद्युत जोडणी देणं.

अटी व शर्ती :

या योजनेसाठी फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थीच अनुज्ञेय असतील.

लाभाचे स्वरूप :

अनुसूचित जाती व नवबौद्ध यांना घरगुती वीज पुरवठा करण्या करिता लागणारी विद्युत यंत्रणा जसे रोहित्र, उच्चदाब वाहिनी व लघुदाब वाहिनी विकसित करणं.

संपर्क :

अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मंडळ.

सूचना  :

अर्ज प्रणालीचं स्वरूप : ऑनलाइन.