समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

उद्दिष्ट :

इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय (अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र) मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने अनुक्रमे सन १९९६ व २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली.

अटी व शर्ती :

  1. उत्पन्न व गुणांची अट नाही.
  2. विद्यार्थिनीकडे स्वतःचे नावाचे आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक.

शिष्यवृत्तीचे स्वरूप :

  1. ५ वी ते ७ वी करितारु. ६०/- दरमहा(१० महिने)

  2. ८ वी ते १० वी करितारु १००/- दरमहा(१० महिने)

 

संपर्क :

  1. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक   
  2. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प . नागपूर